5 Naxalites killed : छत्तीसगडमध्ये चकमकीत ५ नक्षलवादी ठार

जगदलपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस अन् नक्षलवादी यांच्यात चकमक चालू असून यात आतापर्यंत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. ५०० हून अधिक सैनिक या कारवाईत सहभागी झाले आहेत. ४ दिवसांपूर्वी दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर झालेल्या २ चकमकीत सुरक्षादलाने ३० नक्षलवाद्यांना ठार केले होते.