पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्यावर्षी ९ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ५७ गुन्ह्यांमध्ये अमली पदार्थांचा ७ कोटी ७६ लाख रुपये (७८८ किलो) किंमतीचा साठा जप्त केला होता. यामध्ये गांजा, एम्.डी. इफेडीन, कोकेन, एल्.एस्.डी., चरस, अफिम पॉपीस्टा, हेरॉईन आणि मिश्रीत बंटा गोळी यांचा समावेश होता. हा अमली पदार्थांचा साठा रांजणगाव एम्.आय.डी.सी. मधील ‘महाराष्ट्र एन्व्हायर्नमेंट पॉवर लिमिटेड’ या आस्थापनाच्या भट्टीत जाळून नष्ट केला. (संस्कृतीचे माहेरघर असणारे आणि स्मार्ट सिटी म्हणवणार्या पुणे येथे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ड्ग्ज डिस्पोजेबल कमिटी (अमली पदार्थ नष्ट करणारी समिती) गठित करण्यात आली होती. प्रक्रिया पारदर्शी व्हावी; म्हणून मुद्देमालाच्या परिक्षणाकरता एफ्.एल्.सी. कडील तज्ञ, तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी पंच म्हणून नेमण्यात आले होते.