चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या

तमिळनाडू राज्यातील द्रमुक सरकारच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

तामिळनाडू पोलिसांकडून ५०० वर्षे प्राचीन मूर्ती हस्तगत

काहीजण एक प्राचीन मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.

चेन्नई येथे ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’च्या अन्याय कारभाराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र

या वेळी हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर), हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), हिंदु जनजागृती समिती, तसेच समाजातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना उपस्थित होत्या.

वृद्धाश्रमांच्या बांधकामासाठी मंदिरांच्या पैशांचा तुर्तास उपयोग करणार नाही !

मद्रास उच्च न्यायालयात तमिळनाडू सरकारचे आश्‍वासन

हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान ! – तमिळनाडूचे शिक्षणमंत्री

हिंदी बोलणारे लोक आमच्याकडे पाणीपुरी विकतात, असे संतापजनक विधान तमिळनाडूचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांनी केलेे. कोईंबतूर येथील भारथिअर विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न

चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.

सरकारी शाळांत होणार्‍या धर्मांतराविषयी दिशानिर्देश सिद्ध का केले नाहीत ?

शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !