शाळेत परंपरा पाळण्यास बंदी नसल्याचे शाळेचे स्पष्टीकरण

बोर्डे, डिचोली येथील सरकारी प्राथमिक शाळेत हिंदु रितीरिवाज पाळण्यास विद्यार्थिनींवर कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत. शाळेत विद्यार्थिनींना हिंदु रितीरिवाज पाळण्यास एका पालकाने आक्षेप घेतल्याचे वृत्त खोटे आणि शाळेला अपकीर्त करणारे आहे.

पोलादपूर (रायगड) येथील शाळेत ‘तणावमुक्त अध्ययन’ या विषयावर मार्गदर्शन आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन

येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या कंगोरीगड माध्यमिक विद्यालय, मोरसडे-पोलादपूर येथे सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने ‘तणावमुक्त अध्ययन’ या विषयावर श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना भ्रमणभाष वापरण्यावर बंदी

राजस्थान सरकारने सरकारी शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना शाळेच्या परिसरात भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घातली आहे. २७ ऑक्टोबरपासून ही बंदी लागू करण्यात येणार आहे.

शालेय नाटकात नथुराम गोडसे साकारणार्‍या विद्यार्थ्याला संघाच्या गणवेशात दाखवले !

राष्ट्रप्रेमी रा.स्व. संघाला कलंकित करण्यासाठीचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटल्यास त्यात चूक ते काय ? अशा शाळांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये खादीचा पोशाख परिधान करण्याचे आवाहन

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आठवडा, पंधरवडा किंवा मास यांमध्ये १ दिवस खादीचा पोशाख घालण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएस्ई) संलग्न शाळांना दिली आहे.

मालदा (बंगाल) येथे विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्‍या शिक्षकाला अटक

बंगालच्या मालदा जिल्ह्यातील एका खासगी निवासी शाळेमध्ये एका शिक्षकावर लैंगिक शोेषणाचा आरोप झाल्यावर पालकांनी शाळेची तोडफोड केली. ७ वीच्या विद्यार्थिनीने हा आरोप केला.


Multi Language |Offline reading | PDF