Sambhal Azan Without Loudspeakers : संभल (उत्तरप्रदेश) येथील शाही जामा मशिदीच्या छतावरून इमाम भोंग्याऐवजी तोंडाद्वारे देत आहे अजान !

भोंग्यांवरील बंदीचा परिणाम !

(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
(अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)

संभल (उत्तरप्रदेश) – येथील श्री हरिहर मंदिराच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या शाही जामा मशिदीच्या छतावरून येथील इमाम (इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) पूर्वीच्या काळानुसार भोंग्याद्वारे नाही, तर तोंडाद्वारे अजान देत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. (अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)  उत्तरप्रदेशातील धार्मिक स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यावर बंदी आहे.

पोलिसांनी धार्मिक स्थळांमधून अनधिकृतपणे किंवा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणारे भोंगे काढून टाकले आहेत. प्रशासनाने बंदी घालूनही येथील मशिदीतून भोंग्यांवरून अजान देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मशिदीच्या इमामांवर कारवाई केली. आतापर्यंत संभलमधील ३ मशिदींच्या इमामांवर भोंग्यांद्वारे मोठ्याने अजान दिल्याविषयी कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जर संभलमध्ये असे होऊ शकते, तर आता देशात सर्वत्रच असे करणे आवश्यक आहे. देशात १८ हून अधिक राज्यांत, तसेच केंद्रात भाजपचे सरकार असतांना हे अशक्य नाही, असेच कायदाप्रेमी हिंदूंना वाटते !