WB Vishwakarma Puja Holiday Row : विश्वकर्मा पूजेची सुटी रहित करून ईदच्या सुटीत २ दिवसांची वाढ केल्याचा आदेश विरोधानंतर मागे

  • कोलकाता महानगरपालिकेने शाळांसाठी दिला होता आदेश

  • अनावधानाने झालेली चूक असल्याचा पालिकेने केला दावा

तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम

कोलकाता (बंगाल) – कोलकाता महानगरपालिकेने विश्वकर्मा पूजेची सुटी रहित केली आणि ईदची सुटी २ दिवसांनी वाढवली. महानगरपालिकेने हिंदी माध्यमाच्या शाळांसाठी हा आदेश लागू केला होता. या निर्णयाला भाजपने, तसेच समाजानेही विरोध केला. यानंतर कोलकाता महानगरपालिकेने हा आदेश मागे घेतला आणि त्याला अनवधानाने झालेली चूक म्हटले. तसेच हा आदेश देणार्‍या शिक्षण विभागाच्या अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. सक्षम अधिकार्‍यांच्या संमतीविना हा आदेश प्रसारित करण्यात आल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

आदेशामागे कोलकात्याचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम ! – भाजपचा आरोप

हा आदेश २५ फेब्रुवारी या दिवशी प्रसारित करण्यात आला. त्यावर कोलकाता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकाच्या नावाने स्वाक्षरी करण्यात आली होती. यानंतर भाजप नेते जगन्नाथ चट्टोपाध्याय यांनी विचारले की, शिक्षण विभागाच्या मुख्य व्यवस्थापकांना अशी नोटीस बजावण्याचे आदेश कुणी दिले ? बंगालचा कोणताही अधिकारी स्वतःहून असा आदेश देऊ शकत नाही. कोलकाता महानगरपालिकेचा कारभार कोलकात्याचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांच्या हातात असल्याने हे घडले.

संपादकीय भूमिका

कोलकाता महानगरपालिकेत हिंदुद्रोही तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यानेच हा आदेश देण्यात आला, हे वेगळे सांगायला नको !