No Order To Ban Holi, Jaipur School : सोफिया शाळेने विद्यार्थ्यांना शाळेत होळी खेळण्यावर घातलेली बंदी घेतली मागे !

  • शिक्षणमंत्र्यांनी दर्शवला होता विरोध !

  • पर्यावरणपूरक होळी साजरी करणार !

जर कोणताही विद्यार्थी रंग घेऊन आढळला, तर त्याला परीक्षेला बसू दिले जाऊ नये’, असे या शाळेकडून सांगण्यात आले होते !

जयपूर (राजस्थान) : येथील सोफिया वरिष्ठ माध्यमिक शाळेने विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्यास आणि रंग लावण्यास बंदी घालण्याचा आदेश दिला होता. ‘सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्‍चित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर कोणताही विद्यार्थी रंग घेऊन आढळला, तर त्याला परीक्षेला बसू दिले जाऊ नये’, असे शाळेकडून सांगण्यात आले होते.

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर

या प्रकरणी राज्यातील भाजप सरकारमधील शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले की, ‘होळी आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग आहे. तिच्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. शाळेच्या या निर्णयाविरुद्ध आम्ही सी.बी.एस्.ई.कडे (‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन’कडे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे) तक्रार करू’, असे म्हटल्यावर शाळेने माघार घेतली आहे.

आमदार स्वामी बालमुकुंद आचार्य

भाजपचे आमदार स्वामी बालमुकुंद आचार्य म्हणाले होते की, सनातनच्या उत्सवांवर अशा प्रकारे बंदी घालणे योग्य नाही. शाळा व्यवस्थापनाला असा कोणताही अधिकार नाही. होळी खेळणे मुलांचा अधिकार आहे आणि त्यांनी होळी साजरी करावी.

हिंदूंच्या विरोधानंतर शाळेचे स्पष्टीकरण

सोफिया शाळेच्या मुख्याध्यापिका सिंथिया

हिंदूंच्या विरोधानंतर सोफिया शाळेच्या मुख्याध्यापिका सिंथिया यांनी स्पष्टीकरण देतांना सांगितले की, शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासमवेत होळी साजरी केली जाईल. होळी खेळण्यासाठी कधीकधी रासायनिक रंग वापरले जातात; पण शाळेकडून फुलांची होळी आयोजित केली जाईल. पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला जाईल. (हे आधी का सुचले नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

जर शिक्षणमंत्र्यांनी विरोध केला नसता, तर या मिशनरी शाळेने होळी खेळण्यावरील बंदी कायम ठेवली असती, हे लक्षात घेता अशा शाळांवर कठोर कारवाई करणेही आवश्यक आहे. तसेच कुणी पुन्हा असे करू नये; म्हणून तसे नियमच बनवले पाहिजेत !