|
मुंबई – नेरूळ पोलीस ठाणे आणि ‘मरकज-ए-फलाह’ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ मार्च या दिवशी नेरूळ पूर्वमध्ये इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. याविषयीच्या कार्यक्रमाची पत्रिका ‘मरकज-ए-फलाह’ या धार्मिक संघटनेच्या नावे आणि नेरूळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्याची स्वाक्षरी अन् ‘लोगो’ यांच्यासहित प्रसारित झाली होती; पण कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत मेजवानीचा कार्यक्रम रहित करण्यात आला. (सतर्कता बाळगून तत्परतेने कृती करणार्या नेरूळच्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक)
१. पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केल्याचे लक्षात आल्यावर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नेरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी नागपूर येथे झालेली दंगल आणि पोलिसांवर करण्यात आलेले प्राणघातक आक्रमण या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला विरोध केला. याविषयीचे पत्रही परिषदेच्या वतीने नेरूळ पोलिसांना देण्यात आले. याची नोंद घेत इफ्तार मेजवानी रहित करण्यात आली.
🚨 Iftar Feast jointly organised by Nerul Police Station & Markaz-e-Falah, called off after VHP’s strong protest.
Police, who enthusiastically host Iftar feasts, are never seen organising Hindu Dharmik events! Why this bias?
History proves that such appeasement often… pic.twitter.com/7pe5VzZT2w
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 20, 2025
२. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवाडी यांच्याशी संपर्क साधला; मात्र त्यांनी याविषयी बोलणे टाळले.
३. मेजवानीच्या पत्रकामध्ये वापरण्यात आलेला ‘लोगो’ बेकायदेशीर होता, अशी माहिती अधिवक्ता आकाश जगताप यांनी दिली. (या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|