‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध ! कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा भांडाफोड करण्‍यासाठी हिंदूंनी संघटित व्‍हावे !

पानिपतच्‍या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्‍या शक्‍तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्‍या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्‍ती उभी केली पाहिजे.

श्रीसमर्थांच्या चळवळीची गतीसूत्रे

कोणत्याही महापुरुषाच्या विचाराचा मागोवा घेतांना त्याचा कालिक संदर्भ दृष्टीआड करता येणार नाही. समर्थांचा संपूर्ण कार्यकाळ हा आणीबाणीचा होता. कठोर आणीबाणीचा काळ ! आचार-विचारांची सामान्य स्थितीतील आणि आणीबाणीतील तर्‍हा यांत पुष्कळ अंतर असते…..

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !

असंख्‍य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्‍कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्‍हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धाच मोडण्‍यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्‍यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नका !

अन्य पंथीय वारंवार दंगलसदृश स्थिती निर्माण करून शांतता आणि सुव्यवस्था बिघडवतात, तेव्हा ‘ब्र’ ही न काढणार्‍या पुरोगाम्यांना शांततेच्या वातावरणात हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करून हिंदूंमध्ये उत्साह निर्माण करणार्‍या सभांविषयी पोटशूळ उठतो !

भालचंद्र नेमाडे यांचे खरे स्वरूप !

‘हिंदु : जगण्याची समृद्ध अडगळ’ या जाडजूड पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ हा भारतातील साहित्यक्षेत्रातील सर्वाेच्च पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांसमोर यानंतर केलेली विधाने समाजाची दिशाभूल आणि वैचारिक गल्लत करणारी असल्याचे लक्षात आले.

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

इतिहासाचे पुनर्लेखन हवेच !

साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्या पूर्वग्रहदूषित आणि हिंदुद्वेषी मानसिकतेच्या चष्म्यातून भारतीय इतिहासाकडे पाहिल्याने त्यांना येथील पराक्रमी राजे दिसलेच नाहीत किंवा त्यांना मोगल ‘प्यारे’ वाटले. आता शासनांनी दैदीप्यमान अन् गौरवशाली इतिहास भारतियांना अवगत करावा, ही अपेक्षा !

कुंकवाच्या आडून !

जी मंडळी भारतीय संस्कृतीवर टीका करत आहेत, त्यातील अनेक जण वैयक्तिक आयुष्यात कसे वागतात ? नीतीमत्तेचे किती पालन करतात ? याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा आणि त्या तुलनेत पू. भिडेगुरुजी यांचे स्थान काय आहे ? याचे आत्मचिंतन करावे. मग योग्य आणि अयोग्य हे सांगण्यासाठी कुणाचीच आवश्यकता भासणार नाही.