हिंदु राष्ट्राविषयी मत मांडणे, हा हिंदूंचा घटनात्मक अधिकारच ! –  रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्येच भारतीय नागरिकांना ‘धर्म’ आणि ‘उपासना’ यांचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कलम २५ मध्ये ‘धर्माचा प्रचार करणे’ आणि कलम १९ मध्ये ‘आपले मत मांडणे’, याचा अधिकार भारतीय नागरिकांना आहे. यांमुळे भारतात हिंदु समाजाने हिंदु राष्ट्राचे मत मांडले, तर ते पूर्णपणे घटनात्मकच आहे.

श्रीरामजन्मभूमीला न्याय मिळाला ! – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामांनीच आम्हाला हा न्याय मिळवून दिला आहे, अशी आमची भावना आहे. या निकालाचे श्रेय मंदिरासाठी अखंड लढा चालू ठेवणारे हिंदु पूर्वज, बलीदान करणारे साधू-संत, कारसेवक आणि न्यायालयात मंदिराची योग्य बाजू मांडणारे अधिवक्ता यांनाही दिले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शांततापूर्वक स्वीकारावा ! – हिंदु जनजागृती समिती

न्यायालयाकडून येणारा निर्णय सर्वांनी शांततापूर्वक स्वीकारावा आणि त्याचा आदर करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.