विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेण येथील धर्मप्रेमींकडून सांकशी गडाची स्वच्छता !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले श्री सांकशी गडावरील पाण्याची टाकी, तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. १८ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

‘हलाल’ला ‘झटका’ पर्याय देणार ! – ‘ऑनलाईन’ बैठकीत हिंदुत्वनिष्ठांचा निश्चय

हिंदुत्वनिष्ठांनी ‘झटका’ पद्धतीची मटणाची दुकाने चालू करण्याविषयी जनजागृती करण्याचा निश्चय केला, तसेच याविषयी शासकीय पातळीवर कोणती कार्यपद्धत आहे ?, याविषयी जाणून घेतले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन विशेषांक भेट !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती स्तुत्य धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले.

वादळी वारा आणि प्रचंड पावसातही श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या सांगली येथील धारकर्‍यांकडून श्रीरायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मूर्तीची पूजा !

१४ जानेवारी १९९१ पासून ही पूजा सांगलीतील धारकर्‍यांकडून अखंडितपणे चालू आहे. त्‍यामुळेच ही पूजा आता ‘श्रीरायगड व्रत’ बनली आहे !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव !

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून शिवतीर्थावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने अन्नदान !

कोरोना संसर्गाच्या काळापासून कोल्हापुरात येणारा कोणताही गरीब आणि गरजू उपाशी राहू नये, या हेतूने चालू असलेली उत्तरेश्वर थाळी हा कौतुकास्पद उपक्रम असून शिवसेनाप्रमुखांना हीच खरी आदरांजली आहे.

हिंसक पार्श्वभूमी असलेल्या रझा अकादमी संघटनेवर बंदी घाला !

तुळजापूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंदु समाजाला धर्मरक्षणासाठी सातत्याने स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे ३२ मण सुवर्ण सिंहासन रायगडावर स्थापित होणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

पू. भिडेगुरुजी भाग्यनगर येथे ३२ मण सुवर्ण सिंहासन प्रतिष्ठापनेच्या संदर्भात बोलत होते.