देहलीतील मरकझचे कार्यक्रम वेळीच रोखले असते, तर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नसता ! – अमित शहा यांची स्वीकृती

मोदी सरकारची त्याच्या सत्तेच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती ३० मे या दिवशी झाली. त्याविषयी आयोजित एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. देशात तबलिगींमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाली होती.

पालघर येथील साधूंच्या हत्या आणि अधिवक्ता दिग्विजय त्रिवेदी यांचा संशयास्पद मृत्यू यांची चौकशी सीबीआयला सोपवावी ! – हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी संन्यासी श्री कल्पवृक्षगिरी महाराज, (वय ७० वर्षे) आणि श्री सुशीलगिरी महाराज (वय ३० वर्षे) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अधिवक्ता म्हणून न्यायालयात या साधूंचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता दिग्विजय त्रिवेदी यांचे १३ मे या दिवशी डहाणू न्यायालयात जात असतांना वाहन अपघातात निधन झाले.