पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये १२ एप्रिल या दिवशी होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला.

‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या मुळाशी असा काही प्रकार नसल्याचा पुणे विद्यापीठ प्रशासनाचा दावा !

‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून विद्यापिठात मुसलमान विद्यार्थ्यावर आक्रमण केल्याचे प्रकरण !

‘सेट’ परीक्षेला दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित !

शहरातील २२ परीक्षा केंद्रांवर ८ सहस्र १०५ विद्यार्थ्यांनी ७ एप्रिल या दिवशी ‘सेट’ची परीक्षा दिली. यासाठी ९ सहस्र ६३० परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. ८ सहस्र १३० जणांनी पेपर सोडवला.

पीएच्.डी.चा उमेदवार नाव गोपनीय ठेवून तक्रार करू शकतो ! – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्‍यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तूट !

विद्यापिठाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सादर केला. या वेळी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात १९ अध्यासनांपैकी १२ अध्यासनांना प्रमुख नसल्याची माहिती उघड !

शिक्षणाच्या संदर्भात अशी उदासीनता असणे गंभीर आहे !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या पोह्यामध्ये अळी आणि उपम्यामध्ये केस आढळले !

विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न देणार्‍या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची चौकशी करून कारवाई केव्हा होणार ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्राध्यापक भरतीसाठी ५ सहस्र अर्ज !

पुणे विद्यापिठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.विविध विभागांतील प्राध्यापक पदाच्या १११ जागांसाठी ५ सहस्र ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ३८ अर्ज आले आहेत.

विद्यापिठातील साम्यवाद्यांची नाटके !

सावित्रीबाई फुले विद्यापिठाचा ‘ललित कला’ हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ‘जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांसमोर चालू असतांना प्रयोगाच्या प्रारंभी राम, सीता, लक्ष्मण आणि रावण या पात्रांच्या तोंडी विनोदासाठी अश्लील भाषा वापरण्यात आली.

ललित केंद्रातील केंद्रप्रमुखासह ६ जणांना जामीन संमत !

पुणे विद्यापिठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे प्रकरण !