हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे प्रयत्न चालूच !

  • रत्नागिरीतील ‘प्रगती(?)शील साहित्य संमेलना’तील परिसंवादातील (बे)सूर !

  • संमेलनातून मुसलमानांची तळी उचलून त्यांची डागाळलेली प्रतिमा उजळवण्याचा, तर हिंदूंना अप्रत्यक्षपणे दोषी ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न !

रत्नागिरी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही भारतात हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये  द्वेष पसरवण्याचे प्रयत्न चालूच आहेत, असा सूर येथील ‘मुस्लिमांचे बहिष्करण : भारतीय लोकशाही आणि घटनेसमोरील आव्हाने’ या परिसंवादात व्यक्त झाला. ‘प्रगतीशील लेखक संघ (महाराष्ट्र)’ आणि रत्नागिरीतील ‘एस्.पी. महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे पहिले ‘प्रगतीशील साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या परिसंवादात सरफराज अहमद, चैत्रा रेडकर आणि अधिवक्ता अभय टाकसाळ सहभागी झाले होते. या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी किशोर बेडकिहाळ होते.

या वेळी अधिवक्ता टाकसाळ म्हणाले,

१. ‘‘वर्ष १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या वेळी पाकिस्तान धर्म राष्ट्र झाले आणि भारत हिंदु धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाले; मात्र आज ७५ वर्षांनंतरही हिंदु-मुसलमान धर्मांत द्वेष पसरवून ही जखम ताजी ठेवण्याचा प्रयत्न सतत केला जात आहे. त्यातून होणार्‍या वेदनेतून पुन:पुन्हा हा प्रश्न चर्चेला येतो, हे दुर्दैव आहे. गेली ९ वर्षे आपण ते भोगतो आहोत. (फाळणीनंतर जसे धर्माच्या आधारावर इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली, तसे उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. मुसलमानांच्या लांगूनचालनासाठी काँग्रेसने देशाला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ बनवले. त्यामुळे ही जखम अद्याप भरलेलीच नाही ! – संपादक)

२. आपल्याकडे केवळ मुसलमानांवरच नाही, तर दलित, महिला आणि आदिवासी यांच्यावरही बहिष्कार घालण्यात येत आहे. (असे असेल, तर असा आरोप करणारे पोलिसांत तक्रार का करत नाहीत ? कि त्यांनाही केवळ स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे ? – संपादक) या समाजघटकांना बाजूला सारून राष्ट्राची उभारणी केली जात आहे, मग ते खरेच हिंदु राष्ट्र म्हणावे का ? कि बहुजनांना हाताशी धरून हिंदु राष्ट्राची उभारणी केली जात आहे ?, असा प्रश्न उपस्थित होतो. (हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून घेतली असती, तर असा संभ्रम निर्माणच झाला नसता !  मुसलमानांवरील कथित बहिष्कार दिसतो; मात्र हिंदूंचे बलपूर्वक केले जाणारे धर्मांतरण दिसत नाही, हा हिंदुद्वेषच ! – संपादक)

३. हनुमान प्रसाद पोतदार यांनी गीता प्रेस आणि कल्याणी मासिक यांतून मुसलमान द्वेष पसरवला.

४. पोलीस ठाण्यात माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली, तर तेथे नोंद असलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये केवळ मुसलमानच नाही, तर हिंदूंचाही समावेश आहे. मग तो विनयभंग असू दे किंवा बलात्कार. हिंदु पुरुषही हिंदु स्त्रीवर बलात्कार करतो, तिच्यावर वक्रदृष्टी ठेवतो. त्यामुळे धर्माचा आणि विकृतीचा काहीच संबंध नाही; पण राजकारणी मंडळी ‘गुन्हेगार आणि बलात्कारी हा केवळ मुसलमानच आहे’, हे बिंबवण्यात यशस्वी झाले आहेत, याकडे आपण सर्वांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. (सर्वाधिक गुन्हेगार आणि लव्ह जिहादी हे मुसलमानच आहेत, हे जागोजागी घडणार्‍या घटनांवरून सिद्ध होते. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद), श्रद्धा वालकरचे केले गेलेले ३५ तुकडे, अशा सर्व घटना पाहिल्या, तर धर्माचा आणि विकृतीचा काहीच संबंध नाही, असे कसे म्हणणार ? – संपादक)

५. हिंदुत्वाचा जागर करणार्‍यांनी नेहमीच कम्युनिस्टांच्या जवळ जाणे टाळले; कारण त्यांना ‘हेही आपले मित्र आहेत’, हे ओळखता आले नाही. कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश हे मुसलमान नाहीत; पण त्यांच्यासाठी हे लढले आणि त्यांनी प्राण गमावले.

६. मुसलमानंच्या विरोधात वाईट प्रचार केला गेला. ज्या लोकांचा दंगली घडवण्यासाठी वापर केला जातो. त्यांना कधीतरी मशिदीचा परिचय करून द्यावा, ‘अल्ला हो अकबर’चा अर्थ समजावून सांगावा, म्हणजे ते हे काम करण्यास धजावणार नाहीत. आपण विष पसरवण्याचे काम केले; पण आपण धर्मनिरपेक्ष स्वभाव पसरवण्यात न्यून पडलो. (मशिदीमधूनच हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करायची, मदरशांमधून ‘हिंदू कसे काफिर आहेत ?’ हे शिकवायचे. अल्ला हो अकबर म्हणून सर्वत्र दहशत पसरवायची ?, हा मुसलमानांचा परिचय आता सर्वांना ज्ञात झाला आहे ! – संपादक)

७. आधीच्या दंगली संपूर्ण देशभरात भडकत असत, आता मात्र त्या त्या भागांपुरत्याच मर्यादित रहात असून पुन्हा त्यावर चर्चा होत नाही, जीवन पूर्वपदावर येते; कारण आता हिंदु-मुसलमान दोन्ही गट शहाणे झाले आहेत. म्हणूनच मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आता तो शक्य नाही.

सरफराज अहमद म्हणाले की,  

१. भारतात जसे जाती समजून घेण्याचे समाजशास्त्र विकसित झाले नाही, तसेच गेल्या ७५ वर्षांत मुसलमानांचे समाजशास्त्रही विकसित झाले नाही आणि मुसलमानांनाही ते केले नाही. मुसलमानांच्या सांस्कृतिक बहिष्करणाचा प्रारंभ पुष्कळ आधीपासूनच झालेला आहे. औरंगाबाद शहराचे नामकरण हेही त्याचाच एक भाग आहे. (औरंगाबाद हे नाव हिंदूंवर पराकोटीचा अत्याचार करणार्‍या आणि जिहादी आतंकवादी असणार्‍या औरंगजेबाची निशाणी आहे. ती मिटवण्यासाठीचा हा प्रयत्न होता, हे येथे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

२. दखनी मुसलमानांचे ‘औरंगाबाद’ या नावाशी एक प्रकारचे नाते होते. ‘दखनी मुसलमानांना सत्तेच्या राजकारणात येऊ द्यायचे नाही आणि अन्सारी मुसलमानांना पुढे जाऊ द्यायचे नाही’, या खेळाचा राजकारण्यांनी लाभ उचलला आणि निवडणुका जिंकल्या. दखनी मुसलमान समाजाची स्थापना औरंगाबादमध्ये झाली. इतिहासातील अनेक गोष्टींचा पट एका शहराशी निगडित आहे. औरंगजेब या एका व्यक्तीला पुढे करून या शहराची सांस्कृतीक पार्श्वभूमी नामांतर करून नाहीशी करून टाकली. (छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी राज्य संपवण्यासाठी ज्याने आयुष्यभर आटापिटा केला, त्या क्रूरकर्मा आणि कट्टर हिंदुद्वेषी औरंगजेबाची तळी उचलण्याचाच हा प्रकार आहे ! अशांना जनताच त्यांची जागा दाखवील ! – संपादक)

३. छत्रपतींच्या सैन्यातील मुसलमान असोत किंवा आजच्या कोणत्याही क्षेत्रात त्यांना केवळ दुय्यम दर्जाच दिला गेला, त्यांना पुढकार घेऊन नेतृत्वाची संधीच दिली नाही. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कधीही कुणालाही दुय्यम दर्जा दिला गेला नाही. असे असतांना महाराजांविषयी खोटे पसरवणार्‍यांवर सरकारने तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

परिसंवादाचे अध्यक्ष बेडकिहाळ आणि चित्रा रेडकर यांनीही त्यांच्या मनोगतातून मुस्लिम, महिलांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय बहिष्करण यांविषयी ऊहापोह केला.

संपादकीय भूमिका 

  • धर्मांध मुसलमानांविषयी ढळढळीत दिसणार्‍या सत्याकडे दुर्लक्ष करून हिंदूंना अप्रत्यक्षपणे दूषणे देणार्‍यांचे संमेलन म्हणजे ‘एक हत्ती आणि सहा आंधळे’, यातलाच प्रकार म्हणावा लागेल !
  • धर्मांधांसाठी गळे काढणारे पुरो(अधो)गामी धर्मांधांच्या ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करण्याच्या मनसुब्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • असे एकांगी विचार मांडून या संमेलनाच्याच माध्यमातून हिंदु-मुसलमान यांच्यात द्वेष पसरवला जात आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे ते काय ? असे ‘प्रगतीशील’ संमेलन लवकरच ‘अधोगतीला’ जाईल, यात काय शंका ?