पेण येथे शिवप्रतापदिनानिमित्त मातृ-पितृ इच्छापूर्ती दिवस साजरा !
भगव्या ध्वजाचे पूजन करून श्री तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये गोंधळ, शौर्यगीते, तसेच देवीची आरती म्हणण्यात आली. या वेळी अफझलखानवधाचे प्रतीक म्हणून अफझलखानाचे मातीचे मुंडके आई तुळजाभवानीच्या चरणी वहाण्यात आले. सर्व धारकर्यांनी पदयात्रेत उत्साहपूर्ण वातावरणात घोषणा दिल्या, तसेच शौर्यगीतांसह पदयात्राही पार पडली.