बाबरीची पुनरावृत्ती टाळा !

अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. आता श्रीराममंदिर हे स्वप्न राहिले नसून ते येत्या काही वर्षांतच साकार होईल. त्यामुळे याचा आनंद सर्वच अयोध्याजन आणि श्रीरामभक्त यांना झाला आहे.

बाबरी ढाचा पाडल्याचा खटला रहित करून सर्व आरोपींना निर्दोष घोषित करा ! – बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी

अन्सारी पुढे म्हणाले की, या खटल्यातील काही आरोपींचा मृत्यू झाला आहे, तर जे जिवंत आहेत, तेही आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यामुळेच हा खटला रहित केला पाहिजे. श्रीरामजन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आता लागला असल्याने कोणताही वाद शिल्लक नाही.’

रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !  

येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.