बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने विज्ञापनाद्वारे केले हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन !

धर्मांधांना त्यांच्या बिर्याणीचा प्रसार करण्यासाठी हिंदु संतांची आवश्यकता का भासली ? त्यांनी यासाठी त्यांच्या धर्मगुरूंचा वापर का केला नाही ? यावरून हॉटेलच्या मालकाची धर्मांधता दिसून येते.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन का नाही ?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पर्ल पुरी याला जामीन
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांचा सामाजिक माध्यमांतून संताप !

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

यांना लगाम आवश्यकच !

हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !

मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.

लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची मागणी

स्वतःला तथाकथित उद्योजक म्हणवणारे शरद तांदळे यांचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला असून यामध्ये त्यांनी हरिपाठ, पारायण, कीर्तन परंपरा यांची विटंबना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

येत्या ५ दिवसांत हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये योग्य जागा आणि स्थान देऊन सन्मान करा !

हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! भाजपच्या राज्यात हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर अशी मागणी करण्याची वेळ येणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

मद्यालये, बार आदींना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देण्यास प्रतिबंध करण्यासाठी कायदा करावा !

‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.

ओटीटी मंचावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली नाही, तर कायदाच हवा ! – सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी असतांना सरकारने वरवरची उपाययोजना म्हणून नियमावली बनवून सादर केली, असे समजायचे का ? कायदा करण्याचे सूत्र सरकारच्या लक्षात कसे आले नाही ?