
ढाका – महंमद युनूस यांनी अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतल्यापासून बांगलादेशातील परिस्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. देशावर आर्थिक संकट ओढवले आहे. आता बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी पुढील महिन्यात देशात आतंकवादी आक्रमणांची शक्यता असल्याने सतर्कता वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
१. ढाका येथे वरिष्ठ सैन्याधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत जनरल वकार यांनी सूचित केले की, पुढील महिन्यात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात. त्यांनी सर्व सुरक्षायंत्रणांना सतर्क राहण्यास सांगितले.
२. अलीकडच्या काळात बांगलादेशात वाढत्या धार्मिक आक्रमणांची अनेक प्रकरणे समोर येत असतांना सैन्यदलप्रमुखांनी हे विधान आले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार उलथवल्यापासून देशात अस्थिरता वाढली आहे.
३. जनरल वकार यांनी बांगलादेशातील बिघडत्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘गुन्हेगारीचे प्रमाण मागील वर्षांसारखेच राहिले असले तरी, काही उघड घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला हे गुन्हे थांबवायचे आहेत आणि त्यांवर नियंत्रण ठेवायचे आहे.’’
संपादकीय भूमिकाबांगलादेशात धर्मांध मुसलमान आणि जिहादी मनोवृत्तीच्या लोकांना मोकाट सोडल्यास आणखी काय होणार ? बांगलादेश पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल करत असून येणार्या काळात तेथे अराजक माजल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |