गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचे द्योतक !
पुणे – सरकारी कंत्राटामध्ये गुंतवणूक करा, मोठ्या परताव्याचे आमीष दाखवत एका ३८ वर्षीय महिलेची १ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सत्यम जोशी, देविका जोशी, राहुल एरंडवणे, हर्षल चौधरी, कुलदीप कदम आणि वैभव इंगवले यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
आरोपींची वर्ष २०२१ मध्ये पीडित महिलेशी ओळख झाली. अधिक लाभाचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. प्रारंभी महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणुकीवर व्याज दिले. विश्वास संपादन केल्यावर मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास सांगितले. वर्ष २०२१ ते २०२३ या काळात पीडितेने १ कोटी ४३ लाख ७५ सहस्र रुपये गुंतवले. नंतर आरोपींनी व्याज देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पीडितेने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिकाअधिक लाभाच्या मागे लागल्यास काय होते हे दर्शवणारा प्रसंग ! |