पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
‘नसरापूर येथे घडलेल्या घटनेवर जसा जलदगतीने न्याय मिळाला, तसाच शिंगवे पारगावचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे.
रावेत परिसरात सलग २-३ दिवस वीजपुरवठा खंडित केल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक गृहनिर्माण संकुलामधील नागरिकांनी ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर मोर्चा काढत तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलीदान म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ हा ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पुस्तकातून हटवलेला नकाशा पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे,’ अशी भूमिका सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी मांडली.
अवैध ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी २० मे या दिवशी देशव्यापी बंद पुकारला होता.
‘हिंदु जन आक्रोश मोर्चा’नंतर आयोजित सभेमध्ये बोलतांना आमदार संग्राम जगताप यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चेतावणी दिली. या मोर्चाला भाजपचे आमदार महेश लांडगे हेही उपस्थित होते.
नसरापूर परिसरात १ मे या दिवशी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ १० मे या दिवशी एका शांततामय मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वास्को येथील हिंदूंचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांनी हिंदु युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाचा प्रारंभ झाला.
‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’कडून (एन्.सी.ई.आर्.टी.कडून) मराठा साम्राज्याचा नकाशा ८ वीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी येथे श्रीमंत वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
२१ एप्रिल या दिवशी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने मुंबईमध्ये जनआक्रोश महिला पदयात्रा काढली. या वेळी झालेल्या वाहतूककोंडीमुळे त्रस्त होऊन एका महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस यांच्याशी वाद घातला होता.