पुरातत्व विभागाकडील गड जतन करण्यासाठी राज्याकडे द्या !

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची केंद्रशासनाकडे मागणी !

आशिष शेलार (वर्तुळात )

मुंबई – महाराष्ट्रात भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले ५४ गड-दुर्ग आहेत. हे सर्व गड-दुर्ग जतन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाकडे द्यावेत, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी केंद्रशासनाकडे केली आहे. २४ मार्च या दिवशी आशिष शेलार यांनी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रात राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यशासन प्रयत्नरत आहे. केंद्रशासनाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्गही राज्यशासनाकडे दिल्यास त्यांची डागडुजी आणि जतन अत्यंत प्रभावीपणे करता येईल.