Muslims Removed Hindu Saint Statue : तेलंगाणामध्ये धर्मांध मुसलमानांनी बलपूर्वक संत कनक हरिदास यांचा पुतळा हटवला

  • हिंदूंमध्ये संताप, पोलिसांत तक्रार

  • काँग्रेस सरकार मुसलमानांना पाठीशी घालत असल्याचे हिंदूंचा आरोप

बलपूर्वक संत कनक हरिदास यांचा पुतळा हटवतांना धर्मांध मुसलमान !

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांची पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो काढून टाकला. २२ मे या दिवशीच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. ‘राज्यातील काँग्रेसचे सरकार आणि पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत आणि त्यांच्या विरोधात कारवाई करत नाहीत’, असा आरोप स्थानिक हिंदूंनी केला आहे. या प्रकरणात, हिंदूंनी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यात महंमद, माबुसाब, इमाम, रंजू आणि नवाब यांच्यावर आरोप केले आहेत.

१. जोगुलबा गडवाल जिल्ह्यातील गट्टू मंडल भागातील गोरलाखकुडी गावातील हे प्रकरण आहे. येथे कुरुवा समुदायाचे लोक संत कनकदास यांची कुलदेवता म्हणून उपासना करतात.

२. २२ मे या दिवशी पहाटे ४ वाजेपासून कुरुवा समाजातील लोक उपासना करत होते. सकाळी ७ वाजता धर्मांध मुसलमान तेथे पोचले आणि त्यांनी संत कनक हरिदास यांचा पुतळा बलपूर्वक काढून टाकला.

३. ज्या भूमीवर पुतळा स्थापन करण्यात आला होता, ती भूमी हिंदूंची खासगी भूमी आहे.

स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, हा पुतळा एका खासगी भूमीवर स्थापित करण्यात आला होता. या भूमीची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत; मात्र गावातील काही मुसलमान कुटुंबांनी पुतळ्याचा विरोध केला.

४. मुसलमानांचे म्हणणे आहे की, ‘पुतळ्यामुळे सदर मार्गावर अडथळा निर्माण होईल; कारण आमची घरे त्याच्या जवळपास आहेत’, तर हिंदूंचे म्हणणे आहे की, मुसलमानांना जाण्यासाठी २ बाजूंनी मार्ग आहेत. तरीही ते पुतळ्याला विरोध करत आहेत.

५. स्थानिक हिंदूंनी असा आरोप केला आहे की, प्रशासनाचा मुसलमानांना पाठिंबा आहे.

६. या गावात २० ते २५ मुसलमान कुटुंबे आहेत, तर इतर ८०० कुटुंबे आहेत.

७. तेलंगाणातील विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त सचिव डॉ. शशिधर यांनी म्हटले की, गोरलाखोदी येथे मुसलमानांनी केलेले कृत्य चुकीचे असून पोलिसांनी त्यांना अटक करावी. राज्यात हिंदूंच्या विरोधात गुन्हे वाढत आहेत; मात्र काँग्रेस सरकार धर्मांध मुसलमानांना पाठीशी घालत आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट ! भारताला काँग्रेसमुक्त केल्याखेरीज हिंदूंना शांतता लाभणार नाही, हे लक्षात घ्या !