कोल्हापूर – गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक अक्षय कांचन यांना २४ मार्च या दिवशी वडगाव बाजार कोल्हापूर येथून कर्नाटक या ठिकाणी गोवंशियांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी अक्षय कांचन आपल्या साथीदारांसहित पोचले असता कसाई वडगाव बाजारातून गोवंशियांची खरेदी करून ती जनावरे आयशर गाडीमध्ये भरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर थोड्या वेळाने ती गाडी वडगाव बाजारातून कोल्हापूर रस्त्याने निघाली. ती गाडी अडवून आत पहाणी केली असता ११ जर्सी गायी व एक जर्सी वासरू असे एकूण १२ गोवंशीय जनावरे आढळून आली. याविषयी चालकाला विचारले असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक तिपन्ना व्हसकुरबर, राघवेंद्र दुरदुंडी यांच्यावर शिरोळ एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
अक्षय कांचन यांनी सांगितले की, वडगाव बाजारातून नेहमी शेतकरी आणि स्थानिक व्यापार्यांना हाताला धरून कोल्हापूरच्या वतीने कर्नाटक येथे कत्तलीसाठी जनावरे मोठ्या प्रमाणात जात असतात. महाराष्ट्र सीमा पार केल्यानंतर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याच्या अंतर्गत कारवाई होत नाही. त्यामुळे कसायांना मोकळीक मिळून गोवंश कापण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
संपादकीय भूमिकागोवंशियांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी नेहमीच गोरक्षक कसे काय पुढे असतात ? या सर्व गोष्टींवर पोलीस लक्ष का ठेवत नाहीत ? |