ख्रिस्ती धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना फसवण्यात आले, असे म्हटले जाते. आता प्रसिद्ध संत सद्गुरु (जग्गी वासुदेव) हेही ख्रिस्ती प्रचारकांच्या आड येत आहेत. त्यामुळे तमिळनाडू सरकारकडून त्यांच्या विरोधातही षड्यंत्र रचणे चालू झाले आहे का ? हिंदुत्वाला संपवण्याचे नवीन षड्यंत्र रचले जात आहे का ? हे या लेखातून समजून घेऊया.
१. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना फसवण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून कायद्यात सुधारणा
आपल्या सर्वांना माहिती आहे की, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात खटले भरण्यात आले होते, तेव्हा हे प्रकरण माध्यमांनी एवढे उचलून धरले की, ‘पू. आसारामजी बापू हे चुकीचे आहेत’, अशी सार्वजनिक विचारधारा (पब्लिक परसेप्शन) बनली. लोक म्हणायला लागले, ‘कलियुग आहे, संतांनी असे करायला नको होते.’ तथापि त्यांच्या वैद्यकीय चाचणीत काही निष्पन्न झाले नाही, तसेच ज्या मुलीच्या संदर्भात त्यांना अटक झाली, तिच्याही वैद्यकीय चाचणीत काही निष्पन्न झाले नाही. वर्ष २०१३ मध्ये ‘केवळ प्रयत्न केला किंवा त्या व्यक्तीच्या विरोधात बोट दाखवले, तरी त्याने बलात्कार केला आहे, असे समजण्यात येईल’, अशी सुधारणा तत्कालीन केंद्र सरकारने कायद्यात केली. त्यानुसार पू. आसारामजी बापू यांच्या वैद्यकीय चाचणीत काही निघाले नाही, तरी त्यांना अटक करण्यात आली, म्हणजे पू. आसारामजी बापू यांना पद्धतशीरपणे फसवण्यासाठीच वर्ष २०१३ मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. या सुधारणेमुळे पू. बापू अद्यापही कारागृहात आहेत. त्यांच्या विरोधात संपूर्ण जगभर अपप्रचार झाला. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयही ऐकण्याचे धाडस दाखवत नाही. ते परत परत सांगत आहेत की, जे ध्वनीमुद्रण आणि कट कारस्थान झाले होते, त्यांचा परत शोध घ्यावा आणि ते परत आणून ऐकण्यात यावे; पण त्याविषयी कोणताही आदेश दिला जात नाही. पू. बापू ‘एम्स्’ रुग्णालयात भरती आहेत. ‘एम्स्’मध्ये भरती असल्याने त्यांना टाके पडले आहेत. त्यामुळे हे कायदेशीर प्रकरण बनते; पण ‘एम्स्’ रुग्णालय जोधपूरचा अहवाल देण्यास सिद्ध नाही. अशा प्रकारे त्यांच्या संदर्भात पुष्कळ मोठी समस्या निर्माण झाली आहे.
पू. बापू यांना ॲलोपॅथी डॉक्टरांकडून नाही, तर आयुर्वेदाचे उपचार करून घ्यायचे आहेत. त्यासंदर्भात राजस्थान उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यासाठीही सरकार सिद्ध नाही. आपल्याला माहिती आहे की, सध्या ‘आयुर्वेद विरुद्ध ॲलोपॅथी’ युद्ध चालू आहे. ‘स्वामी रामदेव बाबा विरुद्ध इतर’ असा हा वाद चालू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयापासून सर्वाेच्च न्यायालयात एक लांबलचक ‘लॉबी’ (दबावगट) कामाला लागली आहे. मी स्वत: ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जाणे बंद केले आहे आणि काहीही झाले, तरी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद वैद्य यांच्याकडूनच उपचार घ्यायचे ठरवले आहे.
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंनी न्यायालयाला अर्ज करून सांगितले की, त्यांना केवळ आयुर्वेदाच्या वैद्यांनाच दाखवण्यात यावे. यावर राजस्थान उच्च न्यायालयाने सांगितले, ‘औषधे किंवा तंदुरुस्ती हा कोणत्याही व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर ॲलोपॅथीच्या उपचाराची बळजोरी करता येत नाही. त्यांना आयुर्वेदाद्वारे उपचार करून घ्यावेसे वाटत असेल, तर त्याप्रमाणे आयुर्वेदानुसार उपचार करण्यात यावे.’
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना या वैद्यकीय जंजाळात फसवून ठेवले आहे. त्यांच्या, तसेच त्या मुलीच्या वैद्यकीय चाचणीत काहीच निघाले नाही. त्यांच्याविषयी अनेक कथानके रचण्यात आली की, जी नंतर बंद झाली. असे असतांनाही सार्वजनिक धारणेमुळे (‘पब्लिक परसेप्शन’मुळे) हे प्रकरण फसलेले आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष कोण करत आहे ? हे ठाऊक नाही, या प्रकरणावर पुढे कारवाई का केली जात नाही ? हे माहिती नाही आणि सुनावणी का होत नाही ? हेही माहिती नाही. पू. बापू यांच्या प्रकरणाविषयी जनतेची विचारसरणीच अशी बनली की, ‘ते चुकीचे असू शकतात’, असे लोकांना वाटत आहे.
२. ख्रिस्ती धर्मांतराच्या आड येणार्या सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तमिळनाडू सरकारचे षड्यंत्र
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना फसवण्यात आले, त्या वेळी काँग्रेसचे सरकार होते आणि पू. बापू यांनी थेट काँग्रेसला आव्हान दिले होते. अशाच प्रकारे सद्गुरु (जग्गी वासुदेव) आता थेट दुसर्या पंथाला (ख्रिस्ती) आव्हान देत आहेत. ते कोईम्बतूरमध्ये बसून हिंदुत्वाची गोष्ट करतात, हिंदुत्वाच्या वैज्ञानिक आधारांची गोष्ट करतात. त्यांच्या चित्रफिती, प्रवचने आणि त्यांची संमेलने अतिशय लोकप्रिय समजली जातात. त्यामुळे तमिळनाडू सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक नवीन षड्यंत्र रचले आहे. सद्गुरु यांचे ‘ईशा फाऊंडेशन’ आहे. या ‘ईशा फाऊंडेशन’ला फसवण्यासाठी एक नवीन गोष्ट सरकारला कामी आली.
एक ‘हेबियस कॉर्पस’ची याचिका (कैदी किंवा संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर प्रत्यक्ष उपस्थित करण्याची लेखी आज्ञा देणारी याचिका) चेन्नई उच्च न्यायालयात आली. या याचिकेनंतर न्यायालयाने तमिळनाडू सरकारला सूचित केले. तेव्हा राज्य सरकारने उत्तर दिले, ‘ईशा फाऊंडेशन’चे ६ लोक बेपत्ता झाले आहेत.’ ‘ईशा फाऊंडेशन’ म्हणजे सद्गुरुंचा न्यास किंवा संपूर्ण परिवार. सरकारच्या मते एक मुलगा ‘ईशा फाऊंडेशन’च्या कार्यक्रमाला जायचा आणि तेथे सेवा करायचा. एक दिवस ‘त्यांच्या कार्यक्रमाला जातो’, असे सांगून मुलगा घरून गेला, जो परत आला नाही. त्याच्या घरच्यांनी दुसर्या दिवशी ‘ईशा फाऊंडेशन’कडे दूरभाष करून विचारले. तेव्हा ‘२ दिवसांपासून तो तेथे आलाच नाही’, असे समजले. ती व्यक्ती ‘ईशा फाऊंडेशन’मध्ये सेवा करण्यासाठी गेली कि नाही ? कि तिचे रस्त्यातच अपहरण करण्यात आले ? याविषयी काहीच समजले नाही; परंतु यात नाव ‘ईशा फाऊंडेशन’चे आले. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, त्यांच्या विरोधातही अग्नी प्रज्वलीत करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. सद्गुरु आहेत तोपर्यंत सरकारचा कार्यक्रम (हिंदूंच्या धर्मांतराचा कार्यक्रम) पूर्ण होऊ शकत नाही. धर्मांतराच्या कार्यात सद्गुरु मोठी अडचण ठरले आहेत. ते हिंदु कृतींमागील शास्त्र सांगतात, सनातनची शक्ती स्पष्ट करतात, ते भारताची शक्ती सांगतात, ते पौराणिक आणि वैदिक काळाची चर्चा करतात. ते केवळ चर्चाच करत नाही, तर त्यामागील विज्ञानही सांगतात, तसेच त्या मागील विचार सांगतात. त्यांच्यामुळे आतापर्यंत सर्व लोक समाधानी दिसतात. तमिळनाडूत ‘ईशा फाऊंडेशन’चे मोठे धाम आहे. तमिळनाडूची जनता त्यांची मोठ्या प्रमाणात अनुयायी (फॉलोअर्स) आहे. तमिळनाडूमध्ये धर्मांतराच्या कार्यात सद्गुरु सर्वांत मोठी अडचण बनून समोर आले आहेत.
यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. ‘ईशा फाऊंडेशन’चे ६ लोक बेपत्ता आहेत’, असे तमिळनाडू सरकारने म्हणणे, म्हणजे सरकार आता सद्गुरूंच्या विरोधात षड्यंत्र करू शकते किंवा करत आहे. नियतीचा खेळ काय आहे ? हे कुणी ओळखू शकत नाही. ती ठरवेल, तसे होईल आणि ते सर्वांसाठी असेल.’
– अधिवक्ता डी.के. दुबे, सर्वाेच्च न्यायालय. (मार्च २०२४)
(साभार : ‘डी.के. दुबेज लिगल इंटरप्रिटेशन’ यू ट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/channel/UC4vgB_qDWH3-RrgHE1isOYQ)
संपादकीय भूमिकाहिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! |