‘…मग राहुल गांधीनाच प्रथम अंदमान येथील कारागृहात पाठवावे लागेल !’ – रणजीत सावरकर आणि विनोद तावडे यांच्याकडून संजय राऊत यांचे समर्थन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणार्‍यांना २ दिवसांसाठी अंदमान येथील कारागृहात डांबायला हवे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भाजपचे नेते विनोद तावडे आणि सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले आहे.

(म्हणे) ‘संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथील सभेत ‘कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे आहेत’, असे म्हटले होते. यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने स्थानबद्धता छावणीसंबंधी केलेला अहवाल (रिपोर्ट) प्रसारित करत मोदी यांच्यावर टीका केली आहे.