सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांच्यासाठी केंद्र सरकारची नियमावली घोषित !

वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !

ओटीटी अ‍ॅप्सवर नियंत्रण ठेवण्याचा सरकार विचार करत आहे !

ओटीटी अ‍ॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

महाराष्ट्र सरकार विसर्जित करण्यासाठी आखाडा परिषद राष्ट्रपतींना निवेदन देणार

अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.

‘आश्रम’ वेब सिरीजवरून अभिनेते बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांना न्यायालयाची नोटीस

जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी या वेब सिरीजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ‘या सिरीजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असा आरोप त्यांनी करत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत केली आहे.

संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.