D.K. Shivakumar On Muslim Reservation : (म्हणे) ‘मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करणार !’

संसदेपासून देशभरात शिवकुमार यांच्यावर होत आहे टीका

BSNL 5G Network Launch : ‘बी.एस्.एन्.एल्.’ लवकरच ‘५ जी’चे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणार !

प्रत्येक टेलिकॉम आस्थापन त्याचे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असते. या स्पर्धेत आता ‘बी.एस्.एन्.एल्.’ नेही वेग पकडला आहे. ‘बी.एस्.एन्.एल्.’ ने ४ जी नेटवर्कसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Zakir Naik Meet Taliban Intelligence Chief : झाकीर नाईक याने तालिबानच्या गुप्तचर प्रमुखाची घेतली भेट

अलीकडेच त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. अशा परिस्थितीत झाकीरने वासिकची भेट घेतल्यामुळे काही लोकांनी असा दावा केला आहे की, तो पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.

Karnataka Muslim Reservation Row : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मुसलमानांना आरक्षण दिल्याच्या सूत्रावरून संसदेत गदारोळ !

धर्मावर आधारित आरक्षणाचे कोणतेच प्रावधान राज्यघटनेत नाही, तरीही बहुमताचा अपलाभ उठवून राज्यघटनेलाही न जुमानणारी काँग्रेस देशाला कायद्याचे राज्य कधी देईल का ? मुसलमानांच्या लांगूलचालनापोटी राज्यघटनेचा अवमान करणार्‍या काँग्रेसला लोकांनी घरची वाट दाखवणेच योग्य ठरेल !

Bangladesh Garment Industry : गेल्या ७ महिन्यांत १४० कापड कारखाने बंद, तर १ लाख लोक बेरोजगार !

बांगलादेशातील वस्त्रोद्योग हा ८४ टक्के परकीय चलन देशात आणतो, आता तोच जर डबघाईला जात असेल, तर बांगलादेशाची स्थिती पाकिस्तानप्रमाणे होणार ! बांगलादेशालाही पाकप्रमाणे जगापुढे भीक मागावी लागणार, हे कुणी थांबवू शकत नाही !

Protest Against Ayyappa Temple Tradition : केरळच्या अय्यप्पा मंदिरात शर्ट काढून प्रवेश करण्याच्या परंपरेच्या विरोधात आंदोलन

मंदिरांच्या परंपरांचा विरोध करणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि नास्तिकतावादी आहेत का ? हिंदु धर्मातील धार्मिक परंपरांना विरोध करण्याचा प्रयत्न करणारे या माध्यमांतून हिंदु धर्मावर आघात करत असल्याने याचा शोध घेणे आवश्यक आहे !

Sambhal Culprit Zafar Ali Arrested : संभल (उत्तरप्रदेश) येथील दंगलीच्या प्रकरणी कथित जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक

त्याची ४ घंटे चौकशी करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुसलमानांनी दंगल घडवली होती.

गोव्यात शिवशाही होती आणि सुभेदारही होते ! – प्रा. प्रजल साखरदांडे, इतिहासाचे प्राध्यापक

‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यात राज्य नव्हते’, असे म्हणूच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात रहात नसले, तरी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रांतात त्यांनी त्यांचे सुभेदार नेमले होते.

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २६ मार्च या दिवशी दुपारी अर्थमंत्री या नात्याने राज्याचा २०२५-२६ वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.

मराठीप्रेमींचा ३१ मार्चला ‘निर्धार मेळावा’

अभिजात मराठी भाषेला गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी निर्णायक लढा देणार्‍या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ने ३१ मार्च या दिवशी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक ‘निर्धार मेळावा’ घेण्याचे निश्चित केले आहे.