३ सहस्रांहून अधिक भाविकांची उपस्थिती !

कोल्हापूर – रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १३० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी ३ सहस्रांहून अधिक भाविकांची उपस्थिती होती.
१. उद्यमनगर येथील ‘श्री महालक्ष्मी पेपर मार्ट’ आणि ‘शिवम ऑफसेट’ येथे गदापूजन करण्यात आले. या प्रसंगी ‘श्री महालक्ष्मी पेपर मार्ट’चे मालक श्री. महादेव मोरबाळे उपस्थित होते.

२. उंचगाव येथील छत्रपती शिवाजीनगर येथे गदापूजन करून झाल्यावर गावातून पालखी समवेत पूजा केलेली गदा घेऊन गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली.

या प्रसंगी २०० भाविक उपस्थित होते. मंगेश्वर कॉलनीतील हनुमान मंदिरात झालेल्या गदापूजनप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. संतोष चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य भाविक उपस्थित होते.

३. रामदासस्वामी स्थापित मनपाडळे हनुमान मंदिरात गदापूजन करण्यात आले.
४. बानगे या गावचे पैलवान श्री. शशिकांत बोंगार्डे, यांनी या गदापूजनासाठी ७ गदा उपलब्ध करून दिल्या.
५. पन्हाळा गडावर गदापूजन झाले, तर चंदगड येथे मातीची गदा करून त्याचे पूजन करण्यात आले.
६. कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सामूहिक गदापूजनासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
७. शाहूवाडी येथील ‘श्री हनुमान संकुल व्यायामशाळे’तील पैलवान प्रकाश काळे यांच्या पुढाकाराने गदापूजन करण्यात आले.

कर्नाटक – निपाणी (कर्नाटक) येथील हुक्केरी तालुक्यातील निडसोशी येथे गदेची भव्य फेरी काढण्यात आली. यांसाठी ११० भाविक उपस्थित होते. यात २० लहान मुलांचा सहभाग होता.![]() |
