Sambhal Culprit Zafar Ali Arrested : संभल (उत्तरप्रदेश) येथील दंगलीच्या प्रकरणी कथित जामा मशिदीच्या प्रमुखाला अटक

अटक करण्यात आलेला जफर अली

संभल (उत्तरप्रदेश) – येथे ४ माहिन्यांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी पूर्वीचे श्री हरिहर मंदिर असणार्‍या जामा मशिदीचा प्रमुख जफर अली याला २३ मार्चच्या सायंकाळी अटक केली. त्याला सकाळी पोलिसांनी कह्यात घेतले होते. त्याची ४ घंटे चौकशी करण्यात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथे मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुसलमानांनी दंगल घडवली होती. यात ५ मुसलमान ठार झाले होते.

१. पोलीस जफर अली याला तपासणीसाठी नेत असतांना तो पत्रकारांना सांगू लागला की,  या दंगलीत मारले गेलेले सर्व लोक पोलीस आणि प्रशासन यांनी मारले आहेत. मी पोलिसांना उघडे पाडल्यामुळे मला अडकवण्यात आले. (या दंगलीत जे ५ मुसलमान मेले आहेत, ते पोलिसांच्या नव्हे, तर मुसलमान दंगलखोरांच्याच गोळीबारात मेले आहेत. असे असतांना दंगलखोर मुसलमानांवर टीका करण्याऐवजी पोलिसांना बळीचा बकरा बनवणार्‍या जफर अली याला आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)

२. पोलीस अक्षीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई म्हणाले की, २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी वादग्रस्त जागेचे सर्वेक्षण केले जात होते. त्या वेळी लोकांनी दगडफेक आणि गोळीबार केला. या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी जफर अली याला अटक केली.