हॉस्पिसियोतून नवजात बालकाची अदलाबदल केल्याची तक्रार

मडगाव, १२ एप्रिल (वार्ता.) – येथील जिल्हा रुग्णालयात (हॉस्पिसियोत) प्रसूत झालेल्या एका महिलेच्या नवजात बालकाची अदलाबदल केल्याची तक्रार मडगाव येथील एका कुटुंबाकडून करण्यात आली आहे. ‘प्रत्यक्षात मुलगा जन्मला होता; मात्र मातेकडे मुलीला दिले’, असा संबंधित कुटुंबियांचा आरोप आहे.

याविषयी रुग्णालयाचे डॉ. बोरकर म्हणाले, ‘‘बाळ सुपुर्द करतांना जी नोंद केली जाते, त्यावर त्या बाळाच्या आजीची स्वाक्षरी आहे. तिच्याकडे मुलगी सुपुर्द करण्यात आली होती, असे स्पष्टपणे नोंदवहीत लिहिण्यात आले आहे. ही प्रसुती ८ एप्रिल या दिवशी झाली होती. या संदर्भात ११ एप्रिल या दिवशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार कदाचित् गैरसमजुतीने झाला असावा, तरीही यासंबंधी चौकशी चालू आहे.’’