‘युएपीए’ कायद्यामध्ये केलेल्या सुधारणेमुळे आतंकवाद नियंत्रणात आणता येईल ! – संजय बर्वे, पोलीस आयुक्त, मुंबई

‘युएपीए’ कायद्यामध्ये केलेल्या सुधारणा संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत झाल्या आहेत. या कायद्यामुळे आतंकवाद नियंत्रणात आणता येईल, असे मत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ३ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये वृत्तपत्र प्रतिनिधींशी वार्तालाप करतांना व्यक्त केले.

काँग्रेसने आतंकवाद धर्माशी जोडला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काँग्रेसने आतंकवाद धर्माशी जोडला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (युएपीए) विधेयकावर चर्चा करतांना केले.

आझम खान यांचे शीर कापून संसदेच्या दरवाजावर टांगा !- भाजपचे नेते आफताब अडवाणी यांची मागणी

रमा देवी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण : महिलांविषयी असा अनादर जर अन्य कोणी केला असता, तर एव्हाना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यास अटक केली गेली असती ! सामान्य लोकांना एक आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय आहे का ?

५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ४३ टक्के घट

नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात एप्रिल २०१४ ते मे २०१९ या ५ वर्षांच्या काळात त्या पूर्वीच्या ५ वर्षांच्या तुलनेत ४३ टक्के घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिली.

तुमच्या डोळ्यांत डोळे घालून पहात रहावेसे वाटते !

आझम खान यांनी निवडणुकीच्या प्रसाराच्या वेळी भाजपच्या उमेदवार अभिनेत्री जया प्रदा यांच्यावरही अश्‍लील विधाने केली होती, यातून त्यांची मानसिकता लक्षात येते ! अशी अश्‍लील विधाने करणार्‍या लोकप्रतिनिधींना सभागृहातून बडतर्फ करण्याचा कायदा हवा !

आतंकवादी कारवायांत सहभागी असणारे सर्वच जण आतंकवादी घोषित होणार

लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर ‘अवैध कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक २०१९’ (यूएपीए विधेयक) संमत करण्यात आले आहे. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, या विधेयकानुसार आतंकवादी कारवायांमध्ये भाग घेणार्‍या आणि त्या करणार्‍यांना आतंकवादी घोषित करण्यात येणार आहे.

‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते !

‘आपण ऋषींचे वंशज आहोत’, असे भारतीय संस्कृती मानते; पण काही जण ‘आपण माकडांचे वंशज आहोत’, असे म्हणतात. मी अशा व्यक्तींच्या भावना दुखावू इच्छित नाही, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी लोकसभेत ‘मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयका’वरील चर्चेत केले.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी गेल्या ५ वर्षांत १ सहस्र अधिकार्‍यांवर कारवाई

भ्रष्टाचार आणि अनैतिक प्रकरणांत अडकलेल्या १ सहस्र ८३ अधिकार्‍यांना बडतर्फ केले आहे, तर ८६ भारतीय प्रशासकीय सेवा (आएएस्), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस्) आणि अंतर्गत महसूल सेवा (आयआर्एस्) अधिकार्‍यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी चालू करण्यात आली आहे

देशाच्या भूमीवरून सर्व घुसखोरांना बाहेर काढू ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशाच्या भूमीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर रहातात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढले जाईल.


Multi Language |Offline reading | PDF