पुणे – प्रतिवर्षीप्रमाणे नारायणगाव येथे ब्राह्मण संघ, नारायणगाव यांच्या वतीने ३० मार्च गुढीपाडवा ते ६ एप्रिल श्रीरामनवमी दरम्यान श्रीराममंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. चारुदत्त आफळे यांच्या नारदीय कीर्तनाचे आयोजन केले हाते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच भारताची फाळणी या विषयावर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
६ एप्रिलला सकाळी १० ते १२ ह.भ.प. कौस्तुभ परांजपे यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. भगवान श्रीरामांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदायांचे भक्त सहभागी झाले होते.