५६ जखमा आणि शॉकने मृत्यू मारहाणीमुळे पाईपचे १५ तुकडे !
बीड – संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणी हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे. यामध्ये गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चापक, लाकडी बांबू आणि लोखंडी पाईप या ४ हत्यारांनी देशमुख यांच्या शरिरावर १५० वार केल्याचे व्रण आणि ५६ जखमा झाल्या आहेत. त्यांचा पुष्कळ मारहाणीमुळे आणि शॉकने मृत्यू झाला आहे. ही मारहाण एवढी भीषण होती की, या मारहाणीत पाईपचे १५ तुकडे झाले होते. ही माहिती शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालातून समोर आली आहे.
वाल्मीक कराड यांच्या टोळीने हे चारही हत्यार सिद्ध केल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे, तर या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की, जर या हत्याराने एखाद्याला मारहाण झाली, तर या घटनेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे देशमुख यांना किती क्रूरतेने मारण्यात आले, हे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार मृत देशमुख यांना रॉडसारख्या शस्त्राने अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. संतोष यांच्या पाठीसह छाती, हात, पाय आणि चेहरा यांवर करण्यात आले, तसेच त्यांच्या फुफ्फुसाला इजा झालेली आहे.