Protest Against Ayyappa Temple Tradition : केरळच्या अय्यप्पा मंदिरात शर्ट काढून प्रवेश करण्याच्या परंपरेच्या विरोधात आंदोलन

काही आंदोलनकर्त्यांनी शर्ट घालून मंदिरात केला प्रवेश

अय्यप्पा मंदिर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या पठानमथिट्टा येथील भगवान अयप्पा मंदिरात काही पुरुषांनी दीर्घकाळापासून चालू असलेल्या परंपरेचा विरोध केला. यासाठी त्यांनी २३ मार्च या दिवशी शर्ट न काढता मंदिराच्या आत प्रवेश केला. अयप्पा मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुरुष भक्तांसाठी शर्ट काढणे अनिवार्य आहे.

या प्रकरणाशी संबंधित काही चित्रे समोर आली आहेत, ज्यात काही लोक तमिळनाडू देवस्वम् बोर्डाद्वारे व्यवस्थापित परुनाडू मंदिराच्या बाहेर रांगेत उभे राहून शर्ट न काढता प्रार्थना करत असल्याचे दिसून आले. विरोधकांचे हे आंदोलन शांतपणे संपले; कारण पोलिसांनी किंवा मंदिर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही.

आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की, पुरुष भक्तांना शर्ट काढण्याची परंपरा कायमची रहित केली जावी. पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, ‘विरोध शांततामय होता. मंदिर प्रशासनाने आधीच स्पष्ट केले होते की, जर कुणी शर्ट न काढता मंदिरात प्रवेश करत असेल, तर प्रशासनाला कोणतीही अडचण नाही. तथापि भक्त या परंपरेचे पालन करतात.’

संपादकीय भूमिका

मंदिरांच्या परंपरांचा विरोध करणारे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि नास्तिकतावादी आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे. हिंदु धर्मातील धार्मिक परंपरांना विरोध करण्याचा प्रयत्न करणारे या माध्यमांतून हिंदु धर्मावर आघात करत असल्याने याचा शोध घेणे आवश्यक आहे !