Zakir Naik Meet Taliban Intelligence Chief : झाकीर नाईक याने तालिबानच्या गुप्तचर प्रमुखाची घेतली भेट

पाक आणि तालिबान यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी भेट घेतल्याचा दावा

झाकीर नाईक व तालिबानचा गुप्तचर प्रमुख अब्दुल हक वासिक

क्वालालंपूर – भारतात पसार (फरार) घोषित करण्यात केलेले वादग्रस्त धार्मिक उपदेशक आणि आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याने अफगाणिस्तानमधील तालिबानचा गुप्तचर प्रमुख अब्दुल हक वासिक याची नुकतीच भेट घेतली. अलीकडेच त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. अशा परिस्थितीत झाकीरने वासिकची भेट घेतल्यामुळे काही लोकांनी असा दावा केला आहे की, तो पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेले आहेत.

वासिक हा तालिबानचा मोठा चेहरा !

अब्दुल हक वासिक हे तालिबानमधील एक मोठे नाव आहे. वर्ष १९९६ ते २००१ या काळात तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले, तेव्हा वासिक हा गुप्तचर विभागाचा उपमहासंचालक होता. तो अल् कायदाच्या प्रशिक्षण शिबिरांचे निरीक्षणही करतो. ११ सप्टेंबरच्या आक्रमणानंतर त्याला अमेरिकेच्या सैन्याने अटक केली होती. त्याने १२ वर्षे अमेरिकेतील गुआंतानामोबे कारागृहात घालवली आहेत. काबुलमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर वासिक याला गुप्तचर प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.