परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटी ७० लाखांचा निधी संमत !

बीड – १२ जोतिर्लिंगांपैकी पंचम जोतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथील रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी संमत झाला आहे. राज्यातील एकूण १३२ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सोयी-सुविधांसह या भागातील दळणवळण सोयीस्कर आणि गतीमान करण्याच्या कामासाठी या निधीचा लाभ होणार आहे.