मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार ! – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, उद्धव ठाकरे गट
संसदेच्या हिवाळी अधिवेशात मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार, असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशात मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार, असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी ४ दिवसांचा काळ पुरेसा नसून १ मासाची मुदत द्या, नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो, असे महाजन यांनी सांगितले होते.
खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी १६ दिवसांपासून लोणंद पंचायतीसमोर उपोषण चालू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १ डिसेंबर या दिवशी धनगर समाजाने आक्रमक होत पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खंडाळा येथे रस्ताबंद आंदोलन केले.
हिंदूंनी त्यांचा शत्रू ओळखून त्याच्या विरोधात संघटित होण्याचे सोडून एकमेकांच्या विरोधात लढत राहिल्यास ‘इतिहासातून आपण काहीच शिकलो नाही’, असे होईल !
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.
अंतरवाली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.
मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची २ बनावट पत्रे सिद्ध करण्यात आली आहेत. यासंबंधीची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे
धनगर समाजाला ‘अनुसूचित’ म्हणून दाखला मिळावा आणि त्या आधारे आरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने एका अभ्यास समितीची स्थापना केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे.
मराठ्यांना ‘कुणबी’ म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना त्याप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी राज्यशासनाकडून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.
१ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.