कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !

(म्हणे) ‘देशात ‘मनुस्मृति’ लागू झाल्यास ९५ टक्के लोक गुलाम होतील ! – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

मनुस्मृतीचा खरा अभ्यास केला, तर ती किती उपयुक्त आहे, हेच सिद्धरामय्या यांच्या लक्षात येईल; मात्र पारंपरिक मते मिळवण्यासाठी मनुस्मृतीवर अशा प्रकारची टीका करण्याची अहमहमिका अशा नेत्यांमध्ये सध्या लागली आहे, त्याचेच हे एक उदाहरण !

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पातून वगळली मागील भाजप सरकारची गोशाळा योजना !

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !

कर्नाटकातील सरकारी शाळांमध्ये योग आणि ध्यान शिकवण्याच्या निर्णयाकडे काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचा हिंदुद्वेष ! योग आणि ध्यान हिंदु धर्मातील असल्यानेच आणि मागील भाजप सरकारने ते शिकवण्याचा निर्णय घेतला असल्यानेच काँग्रेस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काँग्रेसला मतदान करणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा प्रकल्पासाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

म्हादई पाणी तंटा लवादाने कळसा आणि भंडुरा नाला पेयजल प्रकल्पासाठी पाणी वापरण्यास यापूर्वीच अनुमती दिलेली आहे. पर्यावरण मंत्रालयाची आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर कळसा-भंडुरा प्रकल्पाचे काम चालू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार !

(म्हणे) ‘मनुवाद्यांना भुईसपाट केले पाहिजे !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

शिखांच्या विरोधात दंगली घडवणारे, धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंना वार्‍यावर सोडणारे आणि विविध घोटाळे करणार्‍या काँग्रेसवाल्यांना भुईसपाट करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून पोलीस अधीक्षकांचा  अवमान !

बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आधी खुर्चीवरून उठलेल्या पोलीस अधीक्षकांवर ओरडून त्यांना पुन्हा बसण्यास सांगितले !

कर्नाटकातील ३४ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्याविरुद्ध फौजदारी प्रकरणे नोंद !

देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !

सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित !

व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो ! हे चित्र पालटायला हवे !