विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांचे संस्कार करायचे असतील, तर शिक्षणामध्ये अध्यात्माचा समावेश महत्त्वाचा !

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे प्रतिपादन

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचा ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्काराने सन्मान !

पुणे – शिक्षणाचा अर्थ समजला असता, तर राज्यात वृद्धाश्रम निर्माण झाले नसते. माझे आई-वडील माझ्याच घरात रहातील, हा संकल्प सर्वांनी करावा. भौतिक संपत्तीपेक्षा बौद्धिक संपत्ती माणसाला समाधान देते. कुटुंब समाधानी करायचे असेल आणि विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांचे संस्कार करायचे असतील, तर शिक्षणामध्ये अध्यात्माचा समावेश करणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी व्यक्त केली. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी इंदोरीकर बोलत होते.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’चे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरीमहाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे या वेळी व्यासपिठावर होत्या.  ‘पुण्यनगरीची सांस्कृतिक ओळख या पुरस्काराने कायम ठेवली आहे’, असे मोहोळ यांनी सांगितले.