गोवा पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता ! – मुख्यमंत्री पर्रीकर

गोवा पोलीस दलात पोलीस कर्मचार्‍यांची कमतरता आहे. पोलीस दलात ९६६ कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे, अशी माहिती गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली आहे.

माध्यमप्रश्‍नावर विरोधी भूमिका असलेले पक्ष एकत्र येणे ही तत्त्वहीनता ! – पर्रीकर

गोव्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना चालू असलेले शासकीय अनुदान कोणत्याही परिस्थितीत रहित करावे, या प्रमुख मागणीला अनुसरून अस्तित्वात आलेला पक्ष राज्यातील सर्वच इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान दिले पाहिजे, ही मागणी करणार्‍या पक्षाशी हातमिळवणी करण्यासाठी पुढे आला आहे.

समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांना प्रसंगी अटक करू ! – पर्यटनमंत्री आजगावकर

समुद्रकिनार्‍यांवर मद्यप्राशन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि आवश्यकता भासल्यास त्यांना अटकही केली जाणार आहे.

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार

गोवा शासन शहरातील मद्यालये वाचवण्यासाठी राज्य महामार्ग कायद्यात पालट करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत १ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी उशिरा अबकारी, वित्त आणि इतर खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना दिली.

कळसा-भंडुरा प्रकल्प म्हणजे पर्यावरण टाइमबॉम्ब ! – मुख्यमंत्री पर्रीकर

कर्नाटक शासनाचा कळसा-भंडुरा प्रकल्प पर्यावरणाला अतिशय घातक आहे. हा प्रकल्प म्हणजे एक पर्यावरण टाइमबॉम्ब आहे, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले.

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करणार ! – मंत्री सुदिन ढवळीकर

गोव्यातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त होणार, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत दिले.

पाच वर्षांत ४०० विदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल : नायजेरियन नागरिकांचा सर्वाधिक भरणा

राज्यात मागील पाच वर्षांत सुमारे ४०० हून अधिक विदेशी नागरिकांवर विविध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

लोकांना लाज वाटण्यासारखे विज्ञापन शासन का देते ? – काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा

कदंब महामंडळाच्या बसगाड्यांवर गर्भनिरोधकांचे विज्ञापनफलक लावण्यात आले आहेत. या बसेस राज्यात सर्वत्र फिरतात. हे विज्ञापन मुले पहातात.

सनबर्नसारख्या महोत्सवांमुळे राज्यात पर्यटकांमध्ये वाढ ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर

सनबर्न, सुपरसोनिक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (इडीएम्) महोत्सवांमुळे राज्यात येणार्‍या पर्यटकांमध्ये वाढ झालेली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now