भ्रमणभाषसंच चोरणारा धर्मांध अटकेत !
ठाणे – कल्याण-डोंबिवली परिसरात पादचार्यांकडील भ्रमणभाषसंच हिसकावून पळून जाणार्या हंजला खान या सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भ्रमणभाष चोरीचे ६ गुन्हे नोंद आहेत. त्याने यापूर्वी एका ट्रकचालकाचीही हत्या केली होती. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध असे गुन्हे करण्याचे धाडस करतात. – संपादक)
लाचखोर लिपिक कह्यात !
कल्याण – येथील नागरी सुविधा केंद्रात विवाह नोंदणी विभागातील लिपीक संतोष पाटणे (वय ५२ वर्षे) यांना दीड सहस्र रुपयांची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले. (असे भ्रष्ट कर्मचारी असतांना नागरिकांना (अ)सुविधाच मिळणार ! – संपादक) तक्रारदाराचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लवकर देण्यासाठी पाटणे यांनी लाच मागितली होती. (अशा भ्रष्टाचार्यांची नोकरीतून हकालपट्टी करून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे ! – संपादक)
लाचखोर ग्रामसेवक कह्यात !
पेण – घराच्या मूल्यांकन उतार्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच घेतांना मळेघर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक परमेश्वर जाधव (वय ४८ वर्षे) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी अधिवक्त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
संपादकीय भूमिका : तळागाळापर्यंत मुरलेला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
एस्.टी. कर्मचार्यांचे मार्च महिन्याचे उर्वरित वेतन १५ एप्रिलपर्यंत मिळणार !
मुंबई – एस्.टी. कर्मचार्यांना मार्च मासाचे केवळ ५६ टक्के वेतन देण्यात आले होते. कर्मचार्यांना उर्वरित वेतन प्राप्त व्हावे, यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सरकारकडे मागणी केली होती. याविषयी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाच्या सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. त्यावर ओमप्रकाश गुप्ता यांनी मार्च महिन्याचे उर्वरित ४४ टक्के वेतन १५ एप्रिलपर्यंत देण्यात येईल, असे सांगितले.
नागपूर येथे आस्थापनातील स्फोटात ५ ठार, तर ११ घायाळ !
नागपूर – येथील उमरेड एम्.आय.डी.सी. परिसरातील अॅल्युमिनियम आस्थापनात ११ एप्रिल या दिवशी सायंकाळी झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर ११ जण गंभीर घायाळ झाले. घायाळांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटाच्या वेळी आस्थापनात १५० कामगार होते. स्फोटानंतर सर्वांनी बाहेर आल्याने अनेकांचा जीव वाचला. स्फोटानंतर निर्माण झालेले धुराचे लोळ १ किलोमीटरपर्यंत दिसत होते. स्फोटामुळे येथे काम करणार्या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळले.