शाळा विलीनीकरणाचे ‘मध्यप्रदेश मॉडेल’ देशभरात लागू करणार ! – नीती आयोग
देशभरातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच अल्प शिक्षकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाने महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. आयोगाने सर्व राज्यांना उद्देशून म्हटले आहे की, मध्यप्रदेशचे ‘एक शाळा-एक परिसर’ हे ‘मॉडेल’ देशभरात लागू केले जाऊ शकते.