मुंबई – राज्यशासनाच्या आदेशान्वये १० आय.ए.एस्. अधिकार्यांचे स्थानांतर केले असून काहींना पदोन्नती दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये हे आदेश पारीत केले आहेत. त्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी आणि माजी आय.ए.एस्. अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांचे स्थानांतर केले आहे. दिवसे यांच्या जागी सातार्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पदभार देण्यात आला. सातार्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.