सांगली-कोल्‍हापूर जिल्‍ह्यात प्रचंड पावसाने जनजीवन विस्‍कळीत !

८ नोव्‍हेंबरला सांगली-कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पहाटेपासूनच चालू झालेल्‍या प्रचंड पावसाने जनजीवन विस्‍कळीत झाले. कोल्‍हापूर शहरासह राधानगरी तालुक्‍यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न पडल्‍याने शेतकर्‍यांनी मोसंबी बागेवर चालवली कुर्‍हाड !

मोसंबीसह अन्‍य फळबागा जगवणे अत्‍यंत जिकिरीचे ठरले आहे. पावसाअभावी विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडलेल्‍या आहेत.

पोलीस अधिकारी असल्‍याचे खोटे सांगणार्‍या महिलेवर गुन्‍हा नोंद !

पोलीस अधिकारी असल्‍याचे खोटे सांगून दुकानदारांना धमकावून पैशांची मागणी करणार्‍या एका महिलेविरोधात नेहरूनगर पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

अटक केलेले समाजकंटकच असल्‍याने त्‍यांच्‍या जातीशी देणेघेणे नाही ! – नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक

जाळपोळीच्‍या घटनेत छगन भुजबळ यांचे समर्थक अधिवक्‍ता सुभाष राऊत यांच्‍या उपाहारगृहाला आग लावण्‍यात आली होती.

ओबीसी नेत्‍यांमुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

मनोज जरांगे म्‍हणाले की, मराठा समाजातील जी व्‍यक्‍ती शेती करते, जिला आरक्षणाची आवश्‍यकता आहे. जिच्‍याकडे कुणबीचे पुरावे आहेत, जिला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे.

राज्‍यातील हवामानात सातत्‍याने पालट !

अरबी समुद्रात अल्‍प दाबाचा पट्टा सिद्ध झाल्‍यामुळे वातावरणात सातत्‍याने पालट होत आहेत. दिवसभर ऊन असते, तर पहाटे आणि रात्री थंडीचे प्रमाण वाढते. काही जिल्‍ह्यांमध्‍ये पाऊस पडण्‍याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

वाढते प्रदूषण रोखण्‍यासाठी राज्‍य सरकारकडून उपाययोजना !

राज्‍यात अनेक शहरांमध्‍ये प्रदूषणाची पातळी वाढल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे आरोग्‍य जपण्‍यासाठी पुढील उपाययोजना चालू केल्‍या आहेत

‘हमास’ या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करा ! – बापू ढगे, प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ

पॅलेस्‍टाइनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्‍यांवर आणि आंदोलने करणार्‍यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’अंतर्गत कठोर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. बापू ढगे यांनी केली.

अखेर शिंदे समितीचा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाविषयीचा अहवाल सिद्ध !

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्‍या शिंदे समितीच्‍या आदेशानुसार मराठवाड्यातील ८ जिल्‍ह्यांचे अहवाल आता सिद्ध झालेले आहेत. याविषयी ९ नोव्‍हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता मराठवाड्याचे विभागीय आयुक्‍तांनी अत्‍यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

परदेशी चलनाच्‍या तस्‍करी करणार्‍या टांझानियातील धर्मांधाला अटक !

गुन्‍हेगारीत भारतातील, तसेच विदेशातीलही धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्‍या ! पोलिसांनी अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्‍याविना गुन्‍हेगारीवर नियंत्रण येणार नाही !