वाळूज प्रकल्पाविषयी बैठक घेण्यात येणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज प्रकल्पाविषयी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेले दावे आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज प्रकल्पाविषयी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेले दावे आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’च्या कामांमध्ये झालेल्या तक्रारीविषयी बीड जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे.
विधीमंडळात कोणत्याही चोरमंडळास स्थान असू नये हा लोकशाहीचा संकेत आणि परंपरा आहे. मी त्या परंपरेचे पालन करणारा एक नागरिक आहे, असेही ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नोटिशीला पाठवलेल्या पत्राचे उत्तर देतांना म्हटले आहे.
शेतकर्यांच्या प्रश्नासह सरकारी कर्मचार्यांचा प्रश्न सरकार असंवेदनशीलपणे हाताळत आहे, असा आरोप करून विरोधी पक्षाने २० मार्च या दिवशी विधानसभेतून सभात्याग केला.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मालमत्ता करवसुलीच्या धडक कारवाईला प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये मालमत्ता ‘सील’ करणे, नळजोडणी खंडित करणे, मालमत्ताधारकाचे दुकान किंवा घर यांसमोर ढोल-ताशे वाजवून नोटीस देणे आणि कर वसूल करणे अशी कारवाई शहरात चालू करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त सीबीडी, सानपाडा आणि वाशी येथे भव्य नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सीबीडी येथे ‘सकल हिंदु समाज’ यांच्या वतीने कालीमाता मंदिर ते अलबेला हनुमान मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
कर्मचार्यांच्या मागणीविषयी राज्यशासन पूर्णतः सकारात्मक असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल.
ज्यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान दिले, त्यांच्या स्मरणार्थ हिंदूंनी या मूकपदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उपक्रमांचा हिंदु बांधवांनी तन-मन-धन यांद्वारे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंत्री मुनगंटीवार यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषय योग्य पद्धतीने हाताळले आहेत. त्यामुळे एल्.ई.डी. मासेमारीचा विषय त्याच पद्धतीने हाताळावा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील पारंपरिक मासेमारांची यातून सुटका करावी.