कर्नाटक येथून गोव्यात अनधिकृतरित्या गोवंशियांची वाहतूक : प्रकरणाचे अन्वेषण करा ! – डॉ. सोनाली सरनोबत, सदस्य, कर्नाटक प्राणी कल्याण मंडळ

कर्नाटक येथून गोव्यात अनधिकृतरित्या गोवंशियांची वाहतूक केली जात आहे. वाहतूक आणि गोहत्या यांसाठी नियमबाह्यरित्या प्रमाणपत्र देण्यात येत आहे आणि हे गोवंशीय कर्नाटक येथून गोव्यात हत्येसाठी नेण्यात येत आहेत.

गोतस्करांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सांगणार्‍या दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्‍यांना हत्येची धमकी

गोतस्करांच्या विरोधात कर्नाटकमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. गोहत्यबंदी कायदा केल्यामुळे गोहत्या थांबत नाही, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यावरच ती थांबू शकते, हे सरकार, प्रशासन आणि पोलीस केव्हा लक्षात घेणार ?