गोव्यात आणला जाणारा ८४७ किलो गांजा कह्यात

पुणे-भाग्यनगर महामार्गावर केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, ३ जानेवारी (वार्ता.) – केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (‘डी.आर्.आय्.’च्या) गोवा विभागाने अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणी पुणे-भाग्यनगर राष्ट्रीय महामार्गावर छापा टाकला. या छाप्यात ‘डी.आर्.आय्.’ने पुणे आणि गोवा येथे आणला जाणारा १ कोटी ७० लाख रुपये किमतीचा ८४७ किलो गांजा कह्यात घेतला आहे

सिमेंटच्या ठोकळ्यांची वाहतूक करणार्‍या ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. ‘डी.आर्.आय्.’ने गांजाच्या संदर्भात देशात अलीकडच्या काळात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. गोव्यात डिसेंबर मासाच्या शेवटी आयोजित पार्ट्यांमध्ये या गांजाचा पुरवठा केला जाणार होता. हा गांजा आंध्रप्रदेशातून पुणेमार्गे गोव्यात आणण्यात येत होता.