Mohanji Bhagwat On RSS Ghar Wapsi : संघाने घरवापसी राबवली नसती, तर आदिवासी देशद्रोही बनले असते !
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !
ते हरिद्वार येथील गुरुकुल कांगरी विद्यापिठात आयोजित स्वामी श्रद्धानंद सरस्वती यांच्या ९९ व्या हुतात्मा दिन सोहळ्यात बोलत होते.
मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !
धर्म हा समजावून सांगावा लागतो. जर तो नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी केले.
ते ‘सहजीवन व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘विश्वगुरु भारत’ या विषयावर बोलत होते.
माणूस धर्मापासून दूर गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विश्वामध्ये शांती ठेवण्याची शिकवण आम्हाला सांगून जगात वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु युद्ध थांबत नाही. जगामध्ये शांती ठेवायची असल्यास भारताची आवश्यकता आहे, हे जगाला समजले आहे.
‘माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत’, अशी प्रार्थना करत, ‘प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले.
प.पू. सरसंघचालक पुढे म्हणाले की, काही अंशी अहंकार ही माणसाला कार्यप्रवृत्त करण्यास आवश्यक प्रेरणा ठरते; परंतु त्या पलीकडे येते, ती शाश्वत प्रेरणा ! ती चिरंतन असते.
लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा न्यून व्हायला नको. तसे झाल्यास तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कुणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत.
नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. शरदराव किटकरू यांचा ७३ वा जन्मसोहळा त्यांच्या कुटुंबियांनी नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित केला होता. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही उपस्थित होते…