द्वितीय ‘राज्यस्तरीय मंदिर परिषदे’साठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण !

२ आणि ३ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर येथे द्वितीय ‘राज्यस्तरीय मंदिर परिषद’ घेण्यात येत आहे.

उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ : भ्रमणभाषवर बंदी

उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला २८ नोव्हेंबपासून प्रारंभ झाला आहे.

चीनने खेळलेल्या डावामुळे म्यानमारचे लवकरच तुकडे होण्याचे संकेत !

विस्तारवादी चीनचे डावपेच लक्षात घेऊन भारताने सुद्धसज्ज होणे आवश्यक !

Uttarakhand Rescue A Miracle ! : कामगार सुखरूप बाहेर येणे, हा चमत्कार असल्याने मला तेथील मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील !

अर्नाल्ड डिक्स तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बाबा बौख नाग मंदिरासमोर ते प्रतिदिन प्रार्थना करत होते. याविषयी ते म्हणाले की, मी माझ्यासाठी काही मागितले नाही, तर ४१ कामगार आणि त्यांच्या सुटकेसाठी साहाय्य करणार्‍यांसाठी मी प्रार्थना करत होतो.

मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्यासाठी सुट्यांची वेगवेगळी सूची ! – शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

धर्मनिरपेक्ष देशात धर्मानुसार वेगवेगळ्या सुट्या कशासाठी ? असे प्रकार टाळण्यासाठी देशात लवकरात लवकर समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे !

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांनी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बंदी आणून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

माजी मंत्री सुनील केदार यांच्या घोटाळ्याचा निकाल १८ डिसेंबरला !

सुनील केदार आणि इतर ७ संचालक यांच्याविरुद्धच्या फौजदारी प्रकरणाच्या सुनावणीवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने यापूर्वी उठवली होती.

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा नोंद !

२७ नोव्हेंबर या दिवशी भांडुप येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

वाशी येथील मालमत्ता प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

सी.आर्.इ.डी.ए.आय. आणि बी.ए.एन्.एम्. यांच्या वतीने १ ते ४ डिसेंबर या कालावधीत येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे २२ वे मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

आतंकवादी कृत्याला कधी विसरू नका, कधीही क्षमा करू नका ! – ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त

‘आतंकवादासारखे असे भयंकर कृत्य कधीही विसरू नका, त्याला क्षमा करू नका आणि असे कृत्य पुन्हा होऊ देणार नाही’, हीच आमची भूमिका आहे.’