५७ वर्षीय केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांचे घेतले दर्शन !

वर्ष २०१८ मध्ये जेव्हा सर्व वयोगटातील महिलांच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू होता, तेव्हा शोभा करंदलाजे यांनी मंदिराच्या प्रथेमध्ये पालट करण्यास विरोध करणार्‍या महिलांना पाठिंबा दिला होता.

पुणे येथे ‘झिका’चा पहिला रुग्‍ण !

पुणे – शहरात झिका रोगाचा यंदा पहिला रुग्‍ण आढळला आहे. हा रुग्‍ण येरवड्यातील प्रतीकनगरमध्‍ये सापडला असून आरोग्‍य विभागाने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना चालू केल्‍या आहेत. झिकाचा संसर्ग झालेली ६४ वर्षांची महिला आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्‍ये एक सांस्‍कृतिक कार्यक्रम झाला होता. त्‍याला ही  महिला उपस्‍थित होती. त्‍यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. त्‍यानंतर तिला पुण्‍यातील … Read more

लाच घेतांना नायब तहसीलदार कह्यात !

भूमीची अकृषक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले.

चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष : ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी न्यून करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.’

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेच्‍या निमित्ताने २० नोव्‍हेंबरपासून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वे !

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत मध्‍य रेल्‍वेकडून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वेगाड्या उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

मराठ्यांना ‘कुणबी’ प्रमाणपत्र देण्‍याविषयी नियुक्‍त समिती राज्‍याचा दौरा करणार !

मराठ्यांना ‘कुणबी’ म्‍हणून प्रमाणपत्र देण्‍यासाठी पात्र असलेल्‍या व्‍यक्‍तींना त्‍याप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र देण्‍याची कार्यपद्धत निश्‍चित करण्‍यासाठी राज्‍यशासनाकडून निवृत्त न्‍यायमूर्ती संदीप शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

वनांची औद्योगिक उपयोगिता वाढवण्‍यासाठी राज्‍यात औद्योगिक विकास महामंडळ स्‍थापन होणार !

महाराष्‍ट्रातील एकूण भूमीपैकी २० टक्‍के म्‍हणजे ६१ सहस्र ९०७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. वनाच्‍या माध्‍यमातून उपजीविकेची साधने निर्माण होत आहेत. राज्‍यात वनांपासून विविध ३३ उत्‍पादने घेतली जात आहेत. वनांची उत्‍पादकता वाढवण्‍याच्‍या दृष्‍टीने अभ्‍यास करण्‍यासाठी शासन प्रायोगिक तत्त्वावर समिती स्‍थापन करणार आहे.

‘भाजप ओबीसी सेल’च्‍या वतीने झोपडपट्टीवासीय आणि मेंढपाळ यांच्‍या समवेत दीपावली साजरी !

या प्रसंगी भाजप जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश ढंग, सुनील वाघमोडे, अमर पडळकर, दादासाहेब सरगर, दयानंद खोत, विठ्ठलतात्‍या खोत, अनिरुद्ध गडदे, भीमा कुंभार यांसह अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.

कोल्‍हापूर येथील श्री बालमुकुंद बालावधूत दत्तमहाराज यांच्‍या मठीचा जिर्णोद्धार सोहळा भावमय वातावरणात पार पडला !

याचे पौरोहित्‍य बालमुकुंद रुद्र अभिषेक सेवा केलेले आणि वालावकर ट्रस्‍ट रुग्‍णालयातील प्राणप्रतिष्‍ठा केलेले श्री. बाळकृष्‍ण हरि थिटेगुरुजी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपल्‍यासमोर हवा ! – संदीप पारळे, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

आजरा तालुक्‍यातील मडिलगे गावामध्‍ये दीपावलीच्‍या निमित्ताने गड स्‍पर्धा भरवल्‍या होत्‍या. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने गाव पातळीवर त्‍या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी मुलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.